प्रदूषण वर मराठी निबंध (Pollution Information & Essay In Marathi)

प्रदूषण वर लिहिलेला हा निबंध आणि हि माहिती लहान मुले (kids) आणि class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 व कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रदूषण वर लिहिलेला हा निबंध (Essay On Pollution In Marathi) तुम्ही तुमच्या शाळेच्या किंवा कॉलेज च्या प्रकल्प करीता वापरू शकता.


प्रदूषण वर मराठी निबंध (Pollution Information & Essay In Marathi)


प्रस्तावना

प्रदूषण हा पृथ्वीवरील एक असा कण आहे जो पृथ्वीवर राहणाऱ्या मानव, प्राणी व पक्षी यांच्यासाठी हानीकारक आहे. प्रदूषण हे आपल्या शरीराला सुद्धा हानिकारक आहे. प्रदूषण पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आढळतो.

परंतु महानगरांमध्ये हा अधिक आढळतो. याचे कारण असे आहे की महानगरांमध्ये अनेक कारखाने असतात आणि त्या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. कारखान्यांमधून प्रदूषण होण्याचे कारण हे कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी आणि खराब झालेल्या वस्तू आहेत.

आपण बघतोच की अनेक कारखान्यात आणि विटा बनवणाऱ्या चिमणी मधून खूप खराब धूळ निघत असतो. हा खराब धूळ आपल्या पृथ्वीवर प्रदूषण करण्यास कारणीभूत असतो. महानगरांमध्ये नाहीतर छोट्या गावांमध्ये सुद्धा प्रदूषण बघायला मिळतो.

छोट्या गावांमध्ये लोक कचरा, कचरा पेटीत न टाकता बाहेर खुल्या मैदानात किंवा रस्त्यावर फेकून देतात. ज्यामुळे प्लास्टिक सारखे अनेक वस्तू दिवसान दिवस तिथेच पडले राहतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते.

रोडावर आणि मैदानात फेकलेला कचरा दिवसें दिवस खराब होत जातो आणि त्याच्यातून दुर्गंध यायला लागते व त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतो. हा कचरा आपल्या जवळपास असलेल्या संपूर्ण हवेला प्रदूषित करतो, म्हणूनच संपूर्ण कचरा आपल्याला कचरा पेटी मध्ये टाकला पाहिजे.

कचरा कचरापेटीत टाकल्याने आपल्या आजू बाजू चा परिसर हा शुद्ध आणि साफ सुधरा राहतो आणि प्रदूषण पण होत नाही. हे कार्य करणे आपल्याला याकरिता आवश्यक आहे, कारण जास्त दिवस कचरा तसाच राहिल्याने त्यावर किटाणू आणि विषाणू तयार होत असतात.

अश्या कीटक आणि विषाणूमुळे आपल्याला अतिशय धोकादायक आजारही होऊ शकतात. आपण सर्वांना ही गोष्ट चचांगलीच माहिती आहे की आज पाऊस बरोबर पडत नाही. अगोदरच्या काळात सर्व शेतकरी आपल्या कापणीची वेळ काढत होते आणि कोणत्या महिन्यात पाऊस पडेल हे त्यांना ठाऊक राहत असायचे.

ते शेतकरी त्यानुसार आपापले पिके घेत होते आणि पावसाच्या पाण्याचा वापर करून पिकांना सिंचन करायचे. परंतु आता तसं होत नाही, आज पाऊस वेळेवर पळत नाही. त्यामुळे शेतकरी पीक घेण्याकरिता पावसाचा पाण्याचा वापर करू शकत नाही आणि हे सर्व प्रदूषणामुळे होत आहे.

प्रदूषणामुळे आज ऋतू हे त्यांच्या वेळेवर येत नाहीत. कधी पाऊस पडतो तर कधी ऊन असते, कधी कधी तर ऋतू हा त्यांच्या निश्चित वेळेपेक्षा जास्त दिवस राहत असतो. हे सर्व आज प्रदूषण मुळे होत आहे. आज कोणता पण ऋतू त्याच्या वेळेवर येत नाही आणि त्याच्या वेळेवर जात नाही. याचे मुख्य कारण प्रदूषित झालेले वातावरण आहे.

जो पर्यंत आपण सर्व प्रदूषण ला कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. तो पर्यंत या सर्व समस्या आपल्याला व आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सामोरे जावे लागेल.

प्रदूषण चे प्रकार

वायू प्रदूषण

वायु प्रदूषण हा हवेच्या दूषित झाल्याने होतो. हवा हि तेव्हा दूषित होते, जेव्हा हवे मध्ये हानीकारक पदार्थ आणि मातीचे कण मिसळतात. ही दूषित झालेली हवा मानव शरीराकरिता हानिकारक असते आणि अशाच दूषित हवे मुळे वायु प्रदूषण होतो.

आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक प्राणीला श्वास घेणे आवश्यक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला शुद्ध ऑक्सिजनची आवश्यकता असते. परंतु हवा प्रदूषित झाल्यामुळे प्रदूषित हवा हि आपल्या शरीरात प्रवेश करते.

यामुळे आपल्या शरीराला बरेच नुकसान होते आणि आपल्याला अनेक बिमारीला सामोरे जावे लागते. हेच कारण आहे की वायु प्रदूषण हे आपल्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. हेच नाही तर वायू प्रदूषित असल्याने त्या क्षेत्रात होणारा पाऊस दूषित असतो.

त्या पावसाच्या पाण्यामध्ये हवेत असलेले दूषित पदार्थ मिसळतात आणि खाली जमिनीवर पावसाच्या पाण्यात येत असतात. त्यामुळे पावसाचे पाणी हे शुद्ध राहू शकत नाही आणि जेव्हा शेतकरी ह्याच प्रदूषित पावसाच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करतो, तेव्हा त्यांची पिके सुद्धा खराब होत असतात.

यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. जास्तीत जास्त वायू प्रदूषण गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून आणि प्लास्टिक सारख्या वस्तू मधून निघणाऱ्या धुळामुळे होत असतो.

जर आपल्याला वायु प्रदूषण कमी करायचे असेल, तर आपल्याला या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल आणि प्रयत्न करावा लागेल की आपल्या परिसरातील हवा ही शुद्ध राहील.

वायु प्रदूषण होण्याचे कारण

 • गाडी मधून निघणारा धुवा
 • कारखान्यांच्या चिमणीतून निघणारा धुवा आणि रसायन
 • प्लास्टिकच्या थैल्या बनवतांना निघणारा कार्बन आणि त्याचा दुर्गंध
 • झाडांची कटाई व कोळसा जळल्यानंतर त्यामधून निघणारा धुवा
 • ज्वालामुखीच्या फुटल्यानंतर निघणारा जहरी गॅस

वायु प्रदूषणामुळे होणारे नुकसान

 • वायू प्रदूषणामुळे मानवाला व पशु पक्षींना श्वास घ्यायला त्रास होतो. यामुळे दमा, खोकला, चर्मरोग इत्यादी आजार होत असतात.
 • वायु प्रदूषण मुळे लोकांना अनेकदा फुफ्फुस संबंधित बिमाऱ्या होतात.
 • वायु प्रदूषण मुळे अनेकदा डोळ्यांना त्रास होत असतो. वायु प्रदूषित असल्यामुळे डोळ्यांमध्ये आग होत असते.
 • वायू प्रदूषण मुळे ओझोन परत ही दुर्बल झाली आहे.
 • वायु प्रदूषण मुळे पृथ्वीचे तापमान हे वाढत चालले आहे आणि सूर्याच्या गरमीमुळे पर्यावरणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड, नायट्रोजन सारख्या अनेक गॅसचा प्रभाव वाढत जात आहे. जे आपण सर्वांकरिता खूप हानिकारक आहे.
 • आज वायू प्रदूषण मुळे होणारा पाऊस सुद्धा आम्लवर्षा (acid rain) होत आहे.

जल प्रदूषण

पाण्याचे दूषित होणे म्हणजेच जल प्रदूषण होय. जेव्हा कोणतेही हानिकारक किंवा रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळतात, तेव्हा त्याला जल प्रदूषण असे म्हणतात.

जल प्रदूषण वाढल्यामुळे आपण सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे कठीण होत चालले आहे. अनेक नद्यांमध्ये व तलावांमध्ये मच्छी पालन केले जाते. पण त्या तलावाचे पाणी प्रदूषित असल्यामुळे त्या मच्छाना खाणे शरीरासाठी खूप हानिकारक असते.

जेव्हा दूषित झालेल्या पाण्याने शेतकरी आपले पीक उगवतो, तेव्हा ते पीक खराब व दूषित निघतात आणि त्या पिकांना जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा त्या अन्ना मार्फत आपल्या शरीरात अनेक विषाणू शिरतात.

असे झाल्याने आपल्याला अनेक रोगांना सामोरे जावे लागते. प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे मानव, प्राणी व पक्षी या सर्वांच्या स्वास्थ्याला धोका आहे. प्रदूषित पाण्यामुळे टायफाईड, कावीळ आणि कॉलरा सारखे आजार होत असतात. अश्या भयंकर आजारांपासून वाचणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

जल प्रदूषण हे मुख्यतः नद्यांमधून होत असते, कारण नदीमध्ये कारखान्यांमधून निघणारा कचरा मिळत असतो. आज काल मोठ्या मोठ्या शहरांतील नाल्यांना नदीसोबत मिळवले जाते, ज्यामुळे पाणी हे प्रदूषित होत असते.

हेच नाही तर अनेक कारखान्याचे खराब पाणी हे नदीमध्ये सोडले जाते. पाणी प्रदूषित होने थांबविण्याकरिता आपण सर्वांना या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे व यावर विचार करायला हवा.

जल प्रदूषण मुळे होणारे नुकसान

 • जल प्रदूषण मुळे मानव, पशु व पक्षांचे जीवन मोठ्या धोक्यात आहे. पाण्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे आज पशु पक्षांची मृत्यू होत आहे.
 • जल प्रदूषण मुळे टाइफाइड, पीलिया या सारख्या भयानक बिमाऱ्या होत आहेत. 
 • जल प्रदूषण फक्त मानवाला व पशु पक्षीनाच नाही तर झाडा झुडपांना सुद्धा नुकसान पोहोचवत आहे. आज अनेक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होत आहेत.
 • जल प्रदूषण मुळे आज पिण्याचे पाणी खूप कमी राहिले आहे.

भूमी प्रदूषण

मातीमध्ये रासायनिक पदार्थ मिश्रित झाल्याने भूमी प्रदूषण होतो. भूमी प्रदूषण झाल्याने जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आज भूमी प्रदूषण मुळे शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता जमिनीची कमी होत आहे.

प्रदूषित जमिनीवर पीक घेतल्याने पिके खराब होतात आणि त्या खराब पिकांना जो कोणी सेवन करतो त्याला भयानक विकार होतात. भूमी प्रदूषण जास्त करून शेतामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्याने होतो.

आपल्या पिकांना वाचवण्याकरिता शेतकरी हा कीटकनाशक रसायनाचा वापर करत असतो. यामुळे भूमी प्रदूषण वर मोठा प्रभाव पडतो. हेच नाही तर घरी आणि कारखान्यामध्ये असणारा कचरा जमिनीमध्ये मिळत नाही. जसे प्लास्टिकचा कचरा हा जमिनीमध्ये एकत्र होत नाही आणि यामुळे भूमी प्रदूषण होते.

भूमी प्रदूषण मुळे अन्नाची कमी होत असते. हेच नाही तर प्रदूषित जमिनीवर अन्न उगवून खाल्ल्याने आपल्या शरीराला नुकसान होत असतो. म्हणूनच आपल्याला भूमी प्रदूषित होण्यापासून थांबविले पाहिजे.

भूमी प्रदूषण होण्याचे कारण

 • भूमी प्रदूषण मुख्यतः शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटकनाशकामुळे होत असतो.
 • भूमी प्रदूषण चे दुसरे कारण म्हणजे रोडावर व खाली मैदानात कचरा फेकणे आहे.
 • कारखान्यामधून निघणारे पदार्थ जमिनीमध्ये मिळवणे हा भूमी प्रदूषण चा कारण आहे.
 • प्लास्टिक बॅगचा जास्त वापर करणे व त्यांना कचरापेटीत न टाकता कुठेपण फेकून देणे सुद्धा भूमी प्रदूषण चा कारण बनतो.

भूमी प्रदूषण मुळे होणारे नुकसान

 • भूमी प्रदूषण मुळे आज जमीन ही शेती करण्यायोग्य राहिली नाही.
 • भूमी प्रदूषणामुळे जल प्रदूषण व वायू प्रदूषण या मध्ये वाढ होते.
 • भूमि प्रदूषित झाल्यामुळे जनावरांना निरनिराळे आजार होतात.

ध्वनी प्रदूषण

जास्त तीव्र आणि मोठा आवाज मानवाला ऐकायला कठीण आहे. अश्या आवाजाच्या पसरल्याने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ध्वनी प्रदूषणामुळे आपली ऐकण्याची क्षमता कमी होत असते.

ध्वनि प्रदूषणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि या प्रदूषणामुळे हृदयाचे ठोके खूप वाढत असतात. या प्रदूषणापासून वाचणे आपल्याला खूप गरजेचे आहे. ध्वनी प्रदूषण मुख्यतः गाडींचा जोरात आवाज किंवा एकाद्या कार्यक्रमामध्ये असणाऱ्या लाऊडस्पीकरच्या तीव्र आवाजाने होत असतो.

ध्वनी प्रदूषण होण्याचे कारण

 • ध्वनी प्रदूषण हा मुख्यतः लाऊडस्पीकरवर जोरजोराने गाणी लावल्याने होत असतो.
 • ध्वनी प्रदूषण हा रॅली मध्ये वापरल्या गेलेल्या लाऊड स्पीकर च्या आवाजामुळे होत असतो.
 • गाड्यांमधून येणाऱ्या तीव्र आवाजामुळे सुद्धा ध्वनि प्रदूषण होतो.
 • गाडीमुळे ध्वनि प्रदूषण हा जोऱ्यात हॉर्न वाजवल्यामुळे सुद्धा होतो.

ध्वनी प्रदूषण मुळे होणारे नुकसान

 • ध्वनी प्रदूषण मुळे व्यक्तीला डोकेदुखी, चिडचिडपणा होते.
 • ध्वनी प्रदूषण मुळे व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ही कमी होते. 
 • ध्वनी प्रदूषण मुळे हृदयाची गती वाढते, ज्यामुळे रक्तचाप म्हणजेच ब्लडप्रेशर सारखे आजार होतात.

प्रदूषण कमी करण्याचे उपाय

 • प्रदूषण कमी करण्याकरिता आपल्याला लोकांना जागृत करावे लागेल.
 • वायू प्रदूषण नाही झाले पाहिजे म्हणून आपल्याला आपल्या वाहनांची चांगली देखभाल करावी लागेल.
 • प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला कचरा फक्त कचरा पेटीत टाकावा लागेल.
 • जल प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला खराब पाण्याला चांगल्या पाण्यात वेगळे ठेवले पाहिजे.
 • कारखान्यांमधून निघणाऱ्या दूषित पाण्याला नद्यांमध्ये मिळण्यास रोखले पाहिजे.
 • भूमी प्रदूषण वाचण्याकरिता कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे व कचरा कचरापेटीत फेकला पाहिजे.
 • ध्वनी प्रदूषणला थांबविण्याकरिता आपल्याला लाऊड स्पीकरचा वापर कमी करायला पाहिजे आणि आपल्या गाड्यांमधून येणाऱ्या आवाजाला कमी केले पाहिजे.

तात्पर्य

आपण सर्वांना कोणतेही प्रकार चे प्रदूषण होऊ न देण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रदूषणला आपण सर्व मिळून थांबवू शकतो. यासाठी आपण सर्वांना आपल्या जवळ असलेल्या लोकांना याची माहिती द्यावी लागेल आणि त्यांना प्रदूषण पासून होणारे नुकसान समजून सांगावे लागेल.

जेणेकरून आपण सर्व एकत्र येऊन पर्यावरणाला प्रदूषित होण्यास थांबवू शकू आणि पर्यावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवू शकू. जर आज प्रदुषणाला थांबवले नाही तर आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरण खूप हानिकारक बनेल.


संबंधित लेख/निबंध :-

तर हि होती प्रदूषण ची माहिती (Information About Pollution In Marathi). आज आपण या लेख मध्ये प्रदूषण ची संपूर्ण माहिती बघितली आहे. मी आशा करतो कि प्रदूषण वर मराठी मध्ये लिहिलेला हा निबंध (Marathi Essay On Pollution) तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर याला इतरांशी नक्की share करा.

Sharing is caring!