होळी वर निबंध (Holi Festival Information & Essay In Marathi)

होळी या सणावर लिहिलेला हा निबंध आणि हि माहिती लहान मुले (kids) आणि class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 व कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. होळी वर लिहिलेला हा निबंध (Essay On Holi In Marathi) तुम्ही तुमच्या शाळेच्या किव्हा कॉलेज च्या प्रकल्प करीता वापरू शकता.


होळी वर निबंध (Holi Festival Information & Essay In Marathi)


प्रस्तावना

बुरा ना मानो होली है, हे शब्द आपल्या कानावर होळी येण्या अगोदर ऐकायला मिळतात. हे शब्द ऐकायला आले की आपल्याला समजायला लागते की आनंद आणि उत्साहाने भरपूर होळी हा सण जवळ आलेला आहे.

तसे तर आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाचे काही विशेष महत्व असते. जर महत्त्वपूर्ण सणांची गोष्ट केली तर त्यामध्ये दसरा, दिवाळी, राम नवमी इत्यादी सणाचा समावेश आहे. व या सणांमध्ये महत्वाचा एक सण हा होळी सुद्धा आहे. होळी हा एक असा सण आहे जो हिंदू धर्माचा खूप महत्त्वाचा सण आहे.

होळी हा सण केव्हा साजरा करतात?

आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशातील प्रत्येक सण हा कोणत्या न कोणत्या हंगाम (ऋतू) किंवा पौरानिक कथेशी संबंधित असतो. होळी या सणाबद्दल आपण दोन गोष्टी नक्कीच स्पष्टपणे सांगू शकतो.

पहिली गोष्ट तर ही आहे की हा उत्सव हंगामाच्या संबंधित आहे. शरद ऋतू च्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दरम्यान होळी या सणाला साजरा केला जातो. आपण ह्याला असे सुद्धा म्हणू शकतो की हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो.

इंग्लिश दिनदर्शिकेनुसार होळी या सणाला मार्च महिन्यात साजरा करतात. एक मान्यता अशी सुद्धा आहे की देवाला भोग लावल्याशिवाय कोणतेही वस्तू वापरल्या जात नाही. होळी सणाच्या कालावधीमध्ये पिक हे पिकून तयार होत असते. म्हणूनच त्या अन्नाला अगोदर देवतांना समर्पित केले जाते.

दुसऱ्या शब्दात म्हटलं तर अन्नाला अग्नीत समर्पित केले जाते. अन्नाला संस्कृत मध्ये होलक म्हटले जाते व हिंदी भाषेमध्ये होला असे म्हटले जाते, जो होलिका दहन पासून सुरू होत असतो.

या आधारावर या उत्सवाचं नाव हे होळी पडले आणि याच दिवसापासून लोक हे अन्नाची आहूती अग्नीत देतात व त्याचा प्रसाद ग्रहण करतात. हेच नाही तर लोक एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांना गुलाल लावून आनंद वाटतात.

होळी दहन च्या दिवशी रात्री होलीका ची परिक्रमा केली जाते आणि होलिका ची पूजा केली जाते. या प्रकारे होळी या सणाला आनंदाने सर्व मिळून साजरा करतात.

होळीचे प्रचलन जगभरात

होळी हा सण आजच्या काळात फक्त भारतातच नाही तर भारताच्या शेजारी असलेल्या देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. प्रत्येक देशामध्ये होळी या सणाला वेगवेगळ्या रीतीने साजरा करतात व होळी या सणाचा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

हेच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आपल्या देशात होळी बघायला दुरून दुरून पर्यटक येत असतात, आणि यामुळे पर्यटकांची संख्या खूप जास्त होत असते. याचे कारण आपल्या भारतात होणारे सण आणि उत्सव आहेत, जे जगाला आकर्षित करतात.

होळी साजरी करण्यामागील कथा

होळी हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. म्हटले जाते की प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता. तो खूप अत्याचारी, दुराचारी आणि निरंकुश राजा होता.

या राक्षस राज्याने त्याच्या राज्यांमध्ये निरंकुशता इतकी वाढवलेली होती की त्यामुळे त्याची प्रजा खूप घाबरून राहायची. हिरण्यकश्यप राजाने त्याच्या प्रजेला खूप त्रास दिला होता. त्याला इतका अभिमान झाला होता की त्यांनी स्वतःला देव मानले होते.

तो आपल्या संपूर्ण प्रजेला त्याची पूजा करायला सांगत होता. जर कोणी त्याला देव म्हणायला व त्याची पूजा करण्यास मान्य केले नाही, तर तो त्यांना कठोर दंड द्यायचा. हिरण्यकश्यपला एक मुलगा होता ज्याचे नाव प्रल्हाद होते व तो विष्णू देवाचा खूप मोठा भक्त होता.

तो नेहमी त्याच्या वडिलांचा विरोध करायला व त्यांना त्यांचे दुष्कर्म बंद करायला सांगायचा. हिरण्यकश्यपला त्याच्या मुलाचे असे वागणे आवडत नव्हते, तो त्याला नेहमी समजायचं की त्यांनी विष्णू देवाची आराधना सोडून हिरण्यकश्यपला देव मानावे व त्याची पूजा करावी. 

पण प्रल्हाद त्याचे ऐकत नसल्यामुळे हिरण्यकश्यपला त्याचा खूप राग यायला लागला. प्रल्हाद हिरण्यकश्यपला नेहमी श्री हरी विष्णू जी ची उपासना करायला सांगत होता, पण हिरण्यकश्यपला त्याच्या शक्तीवर खूप घमंड झालेला होता.

या कारणाने तो स्वतःला सर्वश्रेष्ठ देव समजत होता. पण हे त्याला खूप महाग पडले, कारण दुष्कर्मांची फळ हे कधी ना कधी भोगावेच लागतात. हिरण्यकश्यपला त्याच्या दुष्कर्मांची शिक्षा शेवटी विष्णू देवाच्या नरसिंह अवतार ने दिली. पण त्या अगोदर हिरण्यकश्यपने अनेक प्रयत्न केले होते, की जेणेकरून तो प्रल्हाद ला त्याची पूजा न करण्यासाठी दंडित करेल.

होलिका दहन

आपण होळी हा सण दोन दिवस साजरा करत असतो. त्यातील पहिला दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो. यामागे एक कथा आहे. जसे आपणास माहिती आहे की प्रल्हाद हा विष्णू देवांचा परम भक्त होता, जे हिरण्यकश्यपला आवडत नव्हते. व या कारणाने हिरण्यकश्यप प्रल्हाद ला स्वतःला शत्रु समजत होता.

त्यामुळे त्याने प्रल्हाद ला मारण्याकरिता अनेक प्रयत्न केले, परंतु तो यशस्वी नाही झाला. हिरण्यकश्यपला एक बहीण होती जिचे नाव होलिका होते. तिला वरदान होता की तिला अग्नीपासून कोणतीही हानी होणार नाही.

हिरण्यकश्यप ने तिला आदेश दिला व प्रल्हाद ला मारण्याकरिता त्याला घेऊन अग्नी मध्ये बसायला सांगितले. तिने प्रल्हाद ला घेतले व अग्नीत जाऊन बसली. पण इथे उलट घडून आले. वरदान च्या विपरीत होलिका त्या अग्नीमध्ये जळून गेली व प्रल्हाद हा अग्नीपासून सुरक्षित राहिला.

याचे कारण प्रल्हाद ची श्री हरी विष्णू देवाची भक्ती होती. होलीका चे वाईट कृत्य आणि प्रल्हाद च्या भक्तीने हे सिद्ध केले की वरदान हा नेहमी चांगल्या कार्याकरिता वापरायला हवा. हेच कारण आहे की त्या दिवसापासून आपण आज सुद्धा होळी हा सण साजरा करतो आणि पहिल्या दिवशी होलिका दहन करतो, जे वाईट वर सत्याची विजय दर्शवितो.

होलिका दहन ही आपण फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री करत असतो. होलिका दहन च्या दिवशी सर्व खूप उत्साहात असतात. या दिवशी रात्री होलिका बनवतात व अग्नी लावून होलिके ची पूजा करतात. त्यानंतर होलिका ची परिक्रमा केली जाते व प्रसाद वाटला जातो. याप्रकारे होळी च्या पहिल्या दिवशी होलिका दहन सार्वजनिक प्रमाणे पूर्ण केले जाते.

रंगपंचमी

होलिका दहन च्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी सर्व महिला, पुरुष, लहान मुले-मुली हे सकाळपासून ते दुपारपर्यंत रंग खेळतात. या दिवशी सर्व एकमेकांना रंग, गुलाल, अरीब लावत असतात आणि पिचकारीचा वापर करून लहान मुले रंग खेळतात.

अगोदरच्या काळी नैसर्गिक रंगाचा वापर केला जात होता, पण आजच्या काळात रासायनिक रंगाचा वापर केला जातो. आजच्या काळात आपल्याला नैसर्गिक रंगाचा वापर करणे अतिआवश्यक झाले आहे.

कारण नैसर्गिक रंग आपल्या शरीराच्या त्वचेला हानी करत नाही. नैसर्गिक रंग वापरणे याकरिता सुद्धा आवश्यक आहे, कारण नैसर्गिक रंग वापरल्याने आपण होळी मध्ये भरपूर रंग वापरून होळीचा आनंद घेऊ शकतो आणि सोबतच रासायनिक रंगांपासून होणाऱ्या दुष्परिणाम पासून सुद्धा आपला बचाव करू शकतो.

या दिवशी संपूर्ण वातावरण हे रंगाने प्रफुल्लित झाले असते. या दिवशी सर्व आपल्या शत्रूता विसरून एकमेकांना रंग लावत असतात. या दिवशी अनेकांची शत्रुता हि मित्रता मध्ये बदलत असते.

होळीच्या या रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा सर्व रंग खेळत असतात व पिचकारीने रंग एकमेकांवर उधळत असतात, तेव्हा असे वाटते की रंगाची कधी न संपणारी झडी लागलेली आहे. हे दृश्य खरोखरच बघून आनंद होतो.

होळी सणाला होणारे वाईट कार्य

आधीच्या काळात लोक हे होळी खेळण्याकरिता चंदन आणि नैसर्गिक फुलांनी बनवलेल्या रंगांचा वापर करीत होते. पण आजच्या काळात रासायनिक रंगाचा वापर अधिक वाढलेला आहे. ज्यामुळे त्वचेचे रोग सुद्धा जास्त प्रमाणात होत आहेत.

रासायनिक रंग फक्त तुमच्या त्वचेला नाही तर डोळ्यांना सुद्धा हानी करतात. हेच नाही तर या पवित्र सणाला काही लोक हे भांग आणि थंडाई सोडून दारू पितात व नशा करत असतात.

होळीच्या सणाला आधी धार्मिक गाणे लावले जात असायचे, पण आता पिक्चर चे गाणे वाजवली जातात व या पवित्र सणाच्या दिवशी अश्लीलता पसरवतात. हेच ते कारण आहे की आधी जशी या सणाची रोनक असायची ती रोनक आता बघायला मिळत नाही. काही लोक नेहमी नशा करतात व गाडी चालवताना गाडीचा वेग जास्त करतात, त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात.

तात्पर्य

होळी हा सण शत्रुता संपवून मित्रता करवणारा सण आहे. होळी हा सण आपल्याला वाईट कर्माचा साथ सोडून चांगले कर्म करायला सांगतो. या सणाच्या दिवशी आपल्याला आपले वाईट गुण हे होलिका मध्ये दहन करायला पाहिजे आणि चांगल्या गुणांना आत्मसात केले पाहिजे.

होळी या सणाला आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत साजरा करायला हवा आणि आपल्या मनातील सर्व शत्रुता विसरून एकत्र यायला हवे. होळीचा सण हा आनंद घेऊन येतो व आपल्या मनातील वाईट गुणांचा नाश करायचा संदेश देतो.


संबंधित लेख :-

तर हि होती होळी सणाची माहिती (Holi Information In Marathi). आज आपण या लेख मध्ये होळी सणाची संपूर्ण माहिती बघितली आहे. मी आशा करतो कि होळी वर मराठी मध्ये लिहिलेला हा निबंध (Marathi Essay On Holi) तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर याला इतरांशी नक्की share करा.

Sharing is caring!