दिवाळी वर निबंध (Diwali Festival Information & Essay In Marathi)

दिवाळी या सणावर लिहिलेला हा निबंध आणि हि माहिती लहान मुले (kids) आणि class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 व कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दिवाळी वर लिहिलेला हा निबंध (Essay On Diwali In Marathi) तुम्ही तुमच्या शाळेच्या किव्हा कॉलेज च्या प्रकल्प करीता वापरू शकता.


दिवाळी वर निबंध (Diwali Festival Information & Essay In Marathi)


प्रस्तावना

आपला देश भारत हा असा देश आहे, जिथे प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता उत्सव साजरा केला जातो. यामध्ये लहान पासून तर मोठे उत्सव सुद्धा येतात आणि प्रत्येक उत्सव मध्ये स्त्रियांचा सहभाग हा शंभर टक्के असतो.

स्त्रियांना सण साजरा करणे हा त्यांच्या उपवास पासून सुरु होतो आणि उपास संपल्यावर समाप्त होतो. तसे बघितले तर उत्सव साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आनंदी राहणे आणि आनंद वाटणे आहे. दिवाळी हा सण एक मोठा सन आहे, ज्याला सपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

दिवाळी हा सण वर्षातून एकदा साजरा केला जातो. हा सण ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर च्या महिन्यात साजरा केला जातो. या सणाला अमावस्या च्या तिथी मध्ये साजरा करतात. दिवाळी या सणाची वाट सर्व लोक बघत असतात.

लहान मुलांपासून ते म्हातारी लोक आणि तरुण मुले-मुली हा सण साजरा करण्यासाठी खूप उत्सुक असतात. याचे कारण एकच आहे की दिवाळीचा सण हा असा सण आहे, ज्याच्या येताच वातावरण हे शुद्ध आणि आनंदाचा होतो.

दिवाळी सण का साजरा करतात?

आपण सर्वांना माहिती आहे कि अयोध्याचे राजा दशरथ यांना त्यांच्या पत्नी कैकयी यांनी दोन वरदान मागितले होते. या मधील पहिला वरदान असा होता की भगवान राम यांना चौदा वर्षाचा वनवास करावा लागेल आणि दुसरा वरदान असा होता की अयोध्याचे राजा आहे भगवान राम चे भाऊ भरत बनतील.

भगवान राम हे त्यांचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून आपल्या पत्नी सीता आणि लहान भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत वापस येत होते. त्यावेळेस अयोध्या मधील लोकांनी त्यांच्या स्वागत करीता घरोघरी दिवे दिवे लावून अंगणात रांगोळ्या घातल्या होत्या.

अशाप्रकारे अयोध्या च्या लोकांनी भगवान राम चे स्वागत केले होते. त्या दिवशी अमावस्या ची रात्र होती आणि तेव्हापासूनच आपण प्रत्येक वर्षी त्या अमावस्याच्या दिवशी दिवाळी हा सण साजरा करतो.

या सणाला आपण फक्त घरातच नाही तर कार्यालय, दुकाने यांमध्ये सुद्धा साजरा करत असतो. दिवाळीच्या दिवशी सर्व लोक आपला आनंद हा वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करतात. दिवाळी या सणाला दिव्यांचा सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

दिवाळी सण कसा साजरा करतात?

अनेक प्रदेशामध्ये असे अनेक सन आहेत ज्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. पण त्यांना साजरा करण्याचा मार्ग जवळ जवळ एक सारखाच असतो. उदाहरणासाठी मकर संक्रांति, लोहरी, पोंगल हे सण आहेत.

या प्रकारे असे अनेक सण आहेत ज्यांना एखाद्या विशेष क्षेत्रात किंवा विशेष समुदाय मध्ये साजरे केले जातात. जिथे जिथे तो समुदाय असतो तिथे तो सन सुद्धा बघायला मिळतो. काही सण असे सुद्धा आहेत ज्यांच्या मध्ये सारखेपणा बघायला मिळतो, जे जवळ जवळ सर्व भागात साजरे करताना बघायला मिळतात.

दिवाळी हा सण सुद्धा तसाच आहे. आपल्या देशात दिवाळी हा सण हिंदू धर्माचे लोक साजरा करतात. परंतु विदेशात सुद्धा या समुदायाचे लोक मोठ्या आनंदाने एकत्र येतात व दिवाळी सण साजरा करतात.

दिवाळी या सणाचा इतका जास्त उत्साह असतो की लोक या सणाची काही दिवसा आगोदरच तयारीला सुरुवात करतात. सर्व लोक आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार दिवाळी या सणाची तयारी करतात.

या मध्ये घराची मरम्मत करणे, नवीन रंग लावणे व नवीन वस्तू विकत घेणे यांचा सुद्धा समावेश आहे. याच्या मागे दुसरे कारण हे असते की घराची मरम्मत केल्याने व नवीन रंग चढल्याने घर हे जास्त टिकाऊ होतं असते व घराची साफ सफाई सुद्धा होते.

ही साफसफाई फक्त घरांपर्यंत मर्यादित नाही. लोक दुकान, ऑफिस, कार्यालय प्रतिष्ठान यांचीसुद्धा साफसफाई करायला सुरुवात करतात. जास्तीत जास्त व्यापारिक लोक हे दिवाळीच्या दिवसापासूनच त्यांचा व्यवसायिक नवीन वर्ष सुरू करतात. ते दिवाळीच्या दिवसापासून त्यांचे सर्व वही खाते नवीन बनवतात.

दिवाळी येताच सपूर्ण बाजार हा एखाद्या नवरीसारखा सजलेला असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक नवीन दुकाने लागलेली असतात. यामधील काही दुकान ही आपल्याला फुटपाट, रस्त्याच्या कडेला लागलेली दिसतात.

या दिवसांमध्ये फटाक्यांची दुकाने, अगरबत्ती ची दुकाने, लाई खील इत्यादी वस्तूंची दुकाने सुद्धा तात्पुरती सजवलेली व लावलेली असते. दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारात वस्तूची खरेदी आणि विक्री खूप जास्त प्रमाणात होत असते. यामुळे दुकानदार आपल्या दुकानात नवीन साठा आणतात व ग्राहकांना आपल्या दुकानाकडे आकर्षित करत असतात.

बाजारात प्रचंड प्रमाणात असणाऱ्या गर्दीमुळे गाड्यांची आवण जावान सुद्धा थांबवावी लागते. दिवाळीमध्ये बाजारात गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती विकायला असते. सोबतच फुलांची आणि फळांची दुकाने वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेली दिसतात.

दिवाळीचा उत्सव इतका आनंदाचा असतो की लोक या सणाला पूर्ण पाच दिवस साजरा करतात. या पाच दिवसांमध्ये वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा आणि उपासना केली जाते. या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये वेगवेगळे निराळे खाद्यपदार्थ व स्वादिष्ट मिठाई बनवली जाते.

काही लोक या दिवसांमध्ये पत्ते खेळतात आणि काही लोक जुगार सुद्धा खेळतात. माझ्या मते हे सर्व करणे चांगले नाही, जितके होईल तितके आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टी घेतल्या व केल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.

धनतेरस

मान्यतेनुसार दिवाळी हा सण पाच वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा उपासना करून साजरा केला जातो. असे मानले जाते की या प्रकारे देवी देवता हे आपली इच्छा पूर्ण करतात.

दिवाळीचा पहिला दिवस आपण धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो. ह्यात विशेष आपण देवी लक्ष्मीची पूजा करत असतो. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक देवी लक्ष्मीची आरती, भक्ती गीत किंवा मंत्रांचा जप देखील करतात.

असे पण म्हटले जाते की दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनतेरस च्या दिवशी भगवान गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी केल्या जातात. सोबतच दिवाळीच्या पूजेसाठी जे काही वस्तू आवश्यक असते त्यांची सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते. सोबतच पूजेकरिता लाई, मेणबत्त्या, हार सुद्धा खरेदी केले जातात.

नरक चतुर्दशी

तसेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून साजरा केले जाते. या दिवसाला छोटी दिवाळी सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी भगवान कृष्णाने राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच या दिवशी भगवान श्री कृष्णा ची पूजा केली जाते. एक मान्यता अशी पण आहे की या छोट्या दिवाळीच्या दिवशी फक्त दोन दिवे लावले जातात. जे येणाऱ्या दिवाळी सणाचा प्रतीक असतो.

दिवाळीचा दिवस

दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी दिवाळीचा मुख्य सण साजरा केला जातो. या दिवशीच वातावरण हे सकाळपासून उत्सवा सारखे वाटायला लागते. सर्व लोक आपापल्या घरी रांगोळ्या काढतात आणि घराला स्वच्छ करतात.

या दिवशी विशेष करून त्या जागेला स्वच्छ केले जाते, जिथे गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची असते. त्यानंतर एखाद्या लाकडी पाटाला स्वच्च करून त्या जागेवर ठेवले जाते.

दिवाळीच्या या मुख्य दिवशी जितके दिवे लावायचे असतात त्या सर्व दिव्यांना स्वच्छ केले जाते आणि मूर्तींसाठी कपडे, हार, फुले, पाने, अगरबत्ती, धूप, दिवे इत्यादींची अगोदरच सजावट केलेली असते.

एक मान्यता अशी पण आहे की या दिवशी एक मातीचा पक्का दिवा काजळ बनवण्याकरिता विकत घेतला जातो आणि त्या काजळाला सर्व झाल्यानंतर आपल्या डोळ्यांमध्ये लावत असतात. सोबतच घरगुती तूप आणि मोहरीचे तेल सुद्धा आधीच तयार ठेवले जाते.

हिंदू कॅलेंडरनुसार गणपती आणि लक्ष्मीच्या पूजेची वेळ ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर असते. पण खरा पूजेचा वेळ हा ज्योतिषानुसार माहिती होत असतो आणि त्याच अनुसार पूजा केली जाते.

पूजेच्या निर्धारित वेळेवर स्वच्छ केलेल्या पूजेच्या जागेवर पाठ ठेवून गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते. या दिवशी जितके दिवे लावले जातात त्यातील सात दिवे वेगळे करून त्यांमध्ये घरी बनविलेले तूप टाकले जाते आणि त्या दिव्यामध्ये वात टाकून दिव्यांना तयार केले जाते. सोबतच राहिलेले दिवे मोहरीच्या तेलाचा वापर करून लावले जातात.

यानंतर गणपती आणि देवी लक्ष्मीची फुलांचा हार आणि लाई खील घालून पूजा केली जाते व योग्य वेळेवर आरती म्हटली जाते. आता घरात सर्व कडे मोहरीच्या तेलाचे दिवे लावून ठेवले जातात, ज्यामुळे घर हे दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो.

आता वेळ ही लहान मुलांची येते. या वेळेची वाट लहान मुले बघत असतात. आता लहान मुले आणि घरातील संपूर्ण सदस्य हे बाहेर येऊन फटाके फोडतात. हा क्षण लहान मुलांकरिता खूप आनंदाचा क्षण असतो. फटाके फोडून झाल्यानंतर पूजेचा प्रसाद ग्रहण केला जातो. या प्रकारे दिवाळीचा तिसरा दिवस साजरा केला जातो.

दिवाळीचा चौथा दिवस

दिवाळीच्या चौथ्या दिवशी गोवर्धन ची पूजा केली जाते. या दिवशी घरातील मुख्य दरवाज्यात शेनाचे गोवर्धन बनवले जातात, जे भगवान श्री कृष्णाचे प्रतीक आहे. त्यानंतर शेनानी बनवलेल्या गोवर्धन ची पूजा केली जाते.

दिवाळीचा पाचवा दिवस

दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज चा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना घरी बोलावतात व डोक्यावर तिळक लावून त्यांच्या चांगल्या स्वास्थाची आणि लांब आयुष्याची प्रार्थना करतात. दिवाळीच्या या पाचव्या दिवसाच्या सोबतच दिवाळी हा सण समाप्त होतो.

तात्पर्य

तसा तर दिवाळीचा सण हा आनंदाचा सण आहे, पण काही लोक दिवाळी मधील आनंद देणाऱ्या कामांचा दुरुपयोग करतात. दिवाळीमध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणात जुगार खेळतात, ज्यामुळे पैशाची खूप हानी होते.

फटाके खूप जास्त प्रमाणात फोडले तर पर्यावरणात प्रदूषण वाढते. अनेकदा लहान मुलांच्या किंवा इतरांकडून फटाके फोडताना पशु पक्ष्यांना हानी होते. सोबतच आपल्याला सुद्धा हानी होत असते.

फटाके जर लापरवाहीने फोडले गेलेत तर आग लागण्याची भिती सुद्धा असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात आपल्याला फटाके न फोडता त्याच पैशाने इतरांची मदत करायला हवी किंवा जास्त दिवे लावून दिवाळी साजरी करायला हवी.


संबंधित लेख :-

तर हि होती दिवाळी सणाची माहिती (Diwali Information In Marathi). आज आपण या लेख मध्ये दिवाळी सणाची संपूर्ण माहिती बघितली आहे. मी आशा करतो कि दिवाळी वर मराठी मध्ये लिहिलेला हा निबंध (Marathi Essay On Diwali) तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर याला इतरांशी नक्की share करा.

Sharing is caring!